शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

पीओकेमध्ये रॅली घेऊन दाखवा, पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:51 PM

कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी मुझफ्फराबादमध्ये काश्मिरींसमोर रॅली घेऊन दाखवावीभारताने इम्रान खान यांना श्रीनगरमध्ये येण्याची परवानगी द्यावी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांचे आव्हान

इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्याच्या घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे निमित्त करून पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबाद येथे रॅली घेण्यासाठी निमंत्रित केले आहे. तसेच त्याबदल्यात इम्रान खान यांना श्रीनगरमध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी, असे आव्हान दिले आहे. असे झाल्यास काश्मीरमध्ये कुठल्या नेत्याचे किती स्वागत होते, हे जगाला दिसेल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, ''मी भारताच्या पंतप्रधानांना अखेरचा संदेश देऊ इच्छितो. आज कलम ३७० रद्द झाल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले. आज पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री या नात्याने मी तुम्हाला निमंत्रण देतो की, तुम्हाला तुमच्या धोरणावर विश्वास असेल तर मुझफ्फराबादमध्ये काश्मिरींसमोर रॅली घेऊन दाखवा, बघुया तुमचे स्वागत कशापद्धतीने होते ते. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर इम्रान खान यांना श्रीनगरला येऊ द्या. मग बघा इम्रान खान यांचे काश्मीरमध्ये कशा पद्धतीने स्वागत होते ते. काश्मीरवरून सार्वमत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जनतेचे सार्वमत आज होऊन जाईल. हिंमत असेल तर आमचे आव्हान स्वीकारा.''दरम्यान, या विधानानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना ट्विटरवरून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या राजकारण्यांकडे बडबड करण्याव्यतिरिक्त काही काम राहिलेले नाही. ते लढू शकत नाहीत. तसेच जे हवे आहे ते मिळवू शकत नाहीत. तसेच त्यांच्या दहशतवादामुळे ते भारताला फारसे प्रभावित करू शकले नाहीत.काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान कुठून कुठे पोहोचलाय. कधी सांगायचे की काश्मीरसाठी अणुबॉम्बचा वापर करणार म्हणून. मात्र आता पंतप्रधानांना नियंत्रण रेषेपलीकडे येण्याचं आव्हान देत आहेत. आता पुढच्यावेळी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळात कब्बडीचा सामना घेण्याचा सल्लापण ते ते देतील, असा टोला एका ट्विटर युझर्सने लगावला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान