तालिबानचा अजब कारभार! महिला मंत्रालयात महिलांनाच बंदी; केवळ पुरुषांनाच कामाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 08:41 AM2021-09-18T08:41:54+5:302021-09-18T08:42:55+5:30
तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे.
काबूल :तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. आता तालिबानने कहरच केला आहे. महिलांच्या मंत्रालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांनाच कामावर येण्यापासून तालिबानने राेखले आहे. या मंत्रालयात केवळ पुरुषांनाच काम करण्याची परवानगी दिली आहे.
तालिबानने सत्तेवर आल्यानंतर महिलांना शिक्षण आणि राेजगाराची संधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते. मात्र, महिलांच्या राेजगारांवर गदा आणण्याचे काम तालिबानने सुरू केले आहे. ज्या ठिकाणी पुरुष कर्मचारी असतील, तेथे महिला काम करू शकणार नाही, असा फतवा तालिबानने काही दिवसांपूर्वी काढला हाेता. आता तर महिलांच्या मंत्रालयातच महिलांना कामावर येण्यापासून राेखण्यात आले आहे.