Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:35 AM2021-09-03T08:35:47+5:302021-09-03T08:36:39+5:30

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

Taliban may announce new government in Afghanistan today after Namaz | Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

googlenewsNext

अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तालिबानकडून आज अफगाणिस्तानात नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या नमाजनंतर तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती एएफपी संस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. अमेरिकेनं सैन्य पूर्णपणे मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी तालिबाननं काबुल विमानतळही ताब्यात घेतलं. तर पंजशीरमध्येही तालिबानी घुसखोरी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. (Taliban may announce new government in Afghanistan today after Namaz)

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबातुल्ला अखुंदजादा तालिबान सरकारचा सुप्रीम नेता म्हणून घोषीत केलं जाण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानातील दूतावास सुरू ठेवणं आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचं आश्वासन दिल्याचं तालिबानी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे कतारनंही काबुल विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी तालिबानसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. 

महिलांना सरकारमध्ये स्थान नाहीच
युद्धग्रस्त अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तालिबान भक्कम सरकार देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तालिबानकडून सर्वसमावेशक सरकार दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असली तरी तालिबान सरकारमध्ये महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. अफगाणिस्तानातील हेरात येथे कामाच्या अधिकारांसाठी आणि नव्या सरकारमध्ये महिलांना संधी देण्यासाठी काही महिलांना रस्त्यावर उतरुन निदर्शनं केल्याचंही समोर आलं आहे. 

Web Title: Taliban may announce new government in Afghanistan today after Namaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.