Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:38 PM2021-09-06T14:38:54+5:302021-09-06T14:41:56+5:30

Taliban Government: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यावरही कब्जा केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत माहिती दिली आहे.

taliban new government formation afghanistan invites china pakistan iran and others | Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

Next

Taliban Government: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यावरही कब्जा केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत माहिती दिली आहे. आता अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी तालिबानकडून हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी तालिबानकडून 'मित्र' देशांन निमंत्रण पाठविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला

तालिबानकडून तुर्की, चीन, रशिया, इराण, पाकिस्तान आणि कतार या देशांना अफगाणिस्तानताली सत्ता स्थापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. तालिबाननं निमंत्रित केलेल्या सर्व देशांनी याआधीपासूनच तालिबानचं समर्थन केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानकडून या सहा देशांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. 

कतार वगळता इतर सर्व देशांचं अमेरिकेसोबत वाकडं
तालिबानकडून ज्या देशांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातील कतार देश वगळता इतर सर्व देशांचे अमेरिकेसोबतचे संबंध फारसे काही चांगले राहिलेले नाहीत. अमेरिकेनं तालिबानसोबत केलेली चर्चा देखील तकारच्या दोहा येथेच झाली होती. अमेरिकेनं घेतलेली माघार म्हणजे शत्रूवर मिळवलेला विजय असल्याचं तालिबाननं याआधीच म्हटलं होतं. दुसरीकडे चीन आणि रशियासोबत अमेरिकेचं शीतयुद्ध सुरू आहे. तर पाकिस्तान आणि इराणवर अमेरिका निर्बंध लावत आला आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात तर अमेरिका आणि तुर्की यांच्यातील संबंध खूप ताणले गेले होते. 

तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण...

काबुलच्या राष्ट्रपती भवनात तालिबानी सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून मुल्ला बरादर तालिबानी सरकारचे प्रमुख म्हणून घोषीत केली जाण्याची दाट शक्यता आहे. तर मुल्ला हिब्तुल्ला अखुंददाजा सुप्रीम लीडर म्हणून घोषीत केले जाऊ शकतात. 

जगासोबत चांगल्या संबंधांची अपेक्षा
तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यानं सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यात तालिबानला जगासोबत चांगले संबंध हवे आहेत आणि आमचं कुणाही सोबत शत्रुत्व राहिलेलं नाही, याचा पुनरुच्चार केला. यासोबतच चीन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा देश असून चीन जगाची आर्थिक शक्ती आहे. अफगाणिस्तानच्या प्रगतीसाठी आम्हाला चीनचं सहकार्य हवं आहे, असंही जबीउल्लाह म्हणाला. 

"बाहेरुन आलेले लोक इथं विकास करू शकत नाहीत. हे इथल्या जनतेनं समजून घ्यायला हवं. आपल्यालाच आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. काबुल विमानतळावर तुर्की, यूएईहून आलेली पथकं विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करत आहेत", असं जबीउल्लाह मुजाहिद म्हणाला. 

Web Title: taliban new government formation afghanistan invites china pakistan iran and others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.