अनेकदा विनाकारण प्रयोग करणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण समोर आलं आहे. लंडनमध्ये १५ वर्षीय मुलानं अजबगजब प्रयोग केल्यानं त्याच्या गुप्तांगात USB केबल अडकली. त्यानंतर ही केबल बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करत प्रचंड मेहनत घ्यावी लागली. यूएसबी केबलच्या सहाय्याने मुलगा त्याच्या गुप्तांगाचं माप घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गाठ बांधलेली यूएसबी केबल अडकल्याने मुलाचा जीव धोक्यात आला. यूएसबी केबलचे दोन्ही टोक प्रायव्हेट पार्टमध्ये गेले होते. त्यामुळे ते बाहेर काढणं कठीण झालं. यूएसबी केबल अडकल्यानंतर मुलाने ते काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करताना लघवीच्या जागेवरून खूप रक्त वाहू लागलं. हे पाहून मुलाच्या घरचे भयभीत झाले. त्यांनी तातडीने मुलाला हॉस्पिटलला उपचारासाठी हलवले. यूरोलॉजी केस रिपोर्टच्या मते, यूएसबी केबल गुप्तांगात अशाप्रकारे फसला होता ज्यामुळे डॉक्टरांनाही ते बाहेर काढताना समस्या झाली.
मुलाची अवस्था इतकी खराब झाली की त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलं. गुप्तांगाचं माप घेण्याच्या नादात मुलाला स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला. एक्स रे रिपोर्टमध्ये यूएसबी केबल साइज आणि पोजिशन माध्यमातून डॉक्टर्सने माहिती करुन घेतलं. त्यानंतर USB केबल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. सर्जरीवेळी मुलाला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लीकेशन्स झाले नाही. रिकवरीनंतर मुलाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले. मात्र डॉक्टर आजही त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत.
डॉक्टर्सने याबाबत सांगितले की, अशाप्रकारे गुप्तांगामध्ये कुठलीही गोष्ट अडकणे जीवघेणं ठरू शकते. लघवी थांबू शकते. इफेक्टेड भागात जळजळ होऊ शकते. लघवीच्या ठिकाणाहून रक्त येऊ शकते. तसेच मानवी जीवनात खूप अडचणींचा सामना करायला लागू शकतो. इतकचं नाही तर रक्त वाहिल्याने लघवीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. अशावेळी रुग्णाने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना रोखता येऊ शकतात. त्यामुळे सर्जनला उपचार करताना खूप मदत मिळू शकते.