वॉशिंग्टन : अमेरिकेने २०१९ साली जगातील अनेक दहशतवादी संघटनांची तब्बल ४ अब्ज ६० कोटी रुपयांची आर्थिक रसद तोडली. त्यामध्ये पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा अशा काही संघटनांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या वित्तखात्याने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २०१९ साली लष्कर-ए-तय्यबाला मिळणारे २ कोटी ४९ लाख रुपये, हरकत-उल-मुजाहिदीन-अल इस्लामी या संघटनेला मिळणारे ३३ लाख ५७ हजार रुपये, जैश-ए-मोहम्मदला मिळणारे १ लाख २६ हजार रुपये इतकी आर्थिक रसद अमेरिकेने तोडली.
या सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून घातपाती कारवाया करतात. पाकिस्तानातील हिजबुल मुजाहिदीनला मिळणारी ३ लाख १५ हजार रुपयांची आर्थिक रसद अमेरिकेने तोडली. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिदीनला २०१९ साली ३ लाख १५ हजार रुपयांची मदत अमेरिकेने मिळू दिली नव्हती. (वृत्तसंस्था)
सर्वांत मोठा फटका अल कायदाला
२०१९ साली अल कायदा या संघटनेची तब्बल २ कोटी ८५ लाखांची आर्थिक रसद अमेरिकेने तोडली. अल कायदाला दहशतवादी संघटनांमध्ये सर्वांत मोठी आर्थिक मदत मिळत होती.