दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 03:57 PM2017-10-14T15:57:10+5:302017-10-14T16:27:21+5:30

तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The terrorists killed the girl, raped his wife - Joshua Boyle | दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले

दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले

Next

टोरँटो- तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोशुआ बॉयले असं या कॅनडाच्या नागरिकाचं नाव आहे.
 जोशुआ बॉयले हा त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसह पाच वर्ष दहशतवाद्यांच्या कैदेत होते. पाच वर्षानंतर या कैद्यांच्या तावडीतून सुटल्यावर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांना हक्कानी नेटवर्कच्या अतिरेक्यांनी पकडलं तेव्हा त्याची पत्नी कॅटलान कोलमन गर्भवती होती. त्यांच्या या चौथ्या मुलाबद्दल कुणालाही माहिती नव्हती. त्याच्या पत्नीवर एका सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. त्याला त्याचे सहकारी आणि मालक उत्तेजन देत होता, असं त्यांनी सांगितलं.
अफगाणिस्तान- तालिबानच्या नियंत्रण क्षेत्रात कोणतीही एनजीओ पोहचू शकली नाही. तिथे सरकारी मदतही पोहचत नव्हती, अशा गावात बोयले २०१२ मध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. पाच वर्षानंतर पाकिस्तानच्या जवानांनी त्यांची सुटका केली होती. 212मध्ये अफगाणिस्तानमध्ये एका यात्रेदरम्यान या कुटुंबाचं अपहरण झालं होतं.

नेमकं प्रकरण काय ?
पाकिस्ताननं अफगान तालिबानशी संबंधित असलेली दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या ताब्यातून अमेरिकी- कॅनेडियन कुटुंबाला सुरक्षित वाचवण्यासाठी मदत केली. दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या दबावाखाली असल्यानंच पाकिस्ताननं ही कारवाई केल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकी नागरिक व त्यांचे कॅनेडियन पती यांच्या सुरक्षितरीत्या सुटका होणार असल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनाही 2012पासून हक्कानी नेटवर्कनं ओलीस ठेवलं होतं. या दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला अमेरिकेनं आयएसआयची सहाय्यक संघटना म्हणून संबोधित केलं होतं. पाकिस्तान सरकारसोबत मिळून आम्ही बॉयले-कोलमॅन यांची सुटका सुनिश्चित केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत. परंतु ट्रम्प यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.
 

Web Title: The terrorists killed the girl, raped his wife - Joshua Boyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.