वॉशिंग्टन : डिजिटल विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कित्येक तास लागणारी कामे अवघ्या काही मिनिटांमध्ये होऊ लागली आहेत. मात्र, दुसरीकडे फेक न्यूज आणि कंटेंट सेन्सरशिपला प्रोत्साहन देण्यासाठी एआयचा वाढता वापर चिंताजनक असल्याचे अमेरिकेतील फ्रीडम हाऊसच्या अहवालात म्हटले आहे. एआयच्या गैरवापरामुळे अनेक देशांनी इंटरनेट स्वातंत्र्यावर निर्बंध लागू केले. त्यामुळेच इंटरनेट स्वातंत्र्याबाबत जगभरातून आवाज उठवला जात आहे.
कुठे स्वातंत्र्य अबाधित?
आइसलँड, इस्टोनिया, स्वीत्झर्लंड, कॅनडा, जॉर्जिया
सर्वाधिक इंटरनेट बंदी कुठे?
आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी वारंवार इंटरनेट वा सोशल मीडियावर बंदी घालण्याचे प्रमाण इराणमध्ये सर्वाधिक आहे.
फिलिपिन्समध्ये सरकारवर टीका करणाऱ्या वृत्तसंस्थांवर कारवाई करण्यासाठी दहशतवादविरोधी कायद्याचा वापर केला.
कोस्टारिका सरकारने तर देशातील प्रतिष्ठित वृत्तसमूहाला त्रास देण्यासाठी ऑनलाइन ट्रोलर्सचा वापर केला.
कुठे झालाय संकोच?
चीन, उत्तर कोरिया, सीरिया, इराण,बेलारुस
जून २०२२ मध्ये ऑनलाइन माध्यमावरील कृतीमुळे हल्ला झालेल्या देशांतील यूजर्स
कायमस्वरूपी वा तात्पुरत्या स्वरूपात सोशल मीडियावर बंदी असलेल्या देशांतील यूजर्स
एआयमुळे नुकसान काय?
एआयआधारित टूल्सचा वापर खोटी माहिती वा प्रोपगंडाचा प्रचार करण्यासाठी वाढला आहे.
अफवा पसरवणे, विरोधकांना बदनाम
करणे, शंकेचे वातावरण निर्माण करण्यासाठी एआयचा वापर वाढला आहे.
त्यामुळे विविध समाज, धर्मांमध्ये दुही
निर्माण होण्याची शक्यता असते. प्रसंगी अनेक देशांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले.