पृथ्वीकडे वेगाने झेपावतोय अंतराळातील दैत्य, यावर्षी घडवणार विध्वंस, नासाने दिली चिंता वाढवणारी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:05 PM2023-10-05T12:05:06+5:302023-10-05T12:05:21+5:30

Bennu Asteroid: अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने छोट्यामोठ्या उल्का, लघुग्रह येत असतात. त्यातील काही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यावर जळून नष्ट होतात. दरम्यान, अंतराळ संशोधन क्षेत्रात सध्या बेन्नू या लघुग्रहाची चर्चा होत आहे.

The space monster is rushing towards the earth, it will cause destruction this year, NASA has given alarming news. | पृथ्वीकडे वेगाने झेपावतोय अंतराळातील दैत्य, यावर्षी घडवणार विध्वंस, नासाने दिली चिंता वाढवणारी बातमी

पृथ्वीकडे वेगाने झेपावतोय अंतराळातील दैत्य, यावर्षी घडवणार विध्वंस, नासाने दिली चिंता वाढवणारी बातमी

googlenewsNext

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने छोट्यामोठ्या उल्का, लघुग्रह येत असतात. त्यातील काही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यावर जळून नष्ट होतात. दरम्यान, अंतराळ संशोधन क्षेत्रात सध्या बेन्नू या लघुग्रहाची चर्चा होत आहे. त्यामागे दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे नासाने बेन्नू लघुग्रहाचे नमुने आणले आहेत. ते ११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक करण्यात येणार आहेत. दुसरं कारण म्हणजे हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. जर बेन्नू लघुग्रह पृथ्वीवर धडकला. तर त्यामधून १२०० मेगाटन एवढी उर्जा बाहेर येईल. मात्र ही टक्कर होण्याची शक्यता किती आहे. तसेच ती कधी होईल हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बेन्नूबाबत अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सविस्तर माहिती दिली आहे. नासाच्या मते हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता ही ०.३६ टक्के एवढी आहे. त्याला तुम्ही नगण्य म्हणू शकता. मात्र तो पृथ्वीवर धडकला तर तर तो कधी धडकेल, याबाबत अंदाज वर्तवला जात आहे. या शक्यतेबाबत नासाने सांगितले की, हा लघुग्रह २४ सप्टेंबर २१८२ रोजी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. २०२३ पासून १५९ वर्षांनंतर पृथ्वीवर हा लघुग्रह धडकू शकतो. उल्लेखनीय बाब म्हणजे बेन्नू लघुग्रह सुमारे दर सहा वर्षांनंतर पृथ्वी जवळून जातो. याआधी १९९९, २००५ आणि २०११ रोजी पृथ्वीच्या जवळून गेला होता.

बेन्नू लघुग्रहाच्या आकाराबाबतही नासाने मोठा उलगडा केला आहे. त्याबाबत नासाने सांगितले की, न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराएवढा हा लघुग्रह उंच असू शकतो. १९७१ पर्यंत एम्पायर स्टेट ही सर्वात उंच इमारत होती. तिची उंची १०२ मजले एवढी आहे.  

Web Title: The space monster is rushing towards the earth, it will cause destruction this year, NASA has given alarming news.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.