अमेरिकेत काहीही होऊ शकते...आता ट्रम्प यांच्यावरील लेखावरून सट्टेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:16 PM2018-09-07T16:16:44+5:302018-09-07T16:17:42+5:30
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काल न्यूयॉर्क टाइम्समध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर छापून आलेल्या लेखावर अमेरिकेमध्ये खळबऴ माजली आहे. हा लेख कोणी लिहीला असेल यावरून सट्टेबाजीलाही उत आला आहे. उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर संशयाची सुई वळत असून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचेही नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे.
ट्रम्प यांच्यावरून बरेच वादविवाद होत असल्याने लवकरच अमेरिकेमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतात, असे सट्टेबाजीवरील मायबुकी या वेबसाईटचे मुख्य व्यवस्थापक जॅक स्लेटर यांनी सांगितले. तसेच या संधीचा फायदा उठवण्यासाठी सट्टेबाज तयारीत असल्याचेही ते पुढे म्हणाले.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये हा लेख लिहिणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी 100 डॉलरची पैज लावण्यात आली आहे. जिंकणाऱ्याला दुप्पट रक्कम दिली जाणार आहे. आता पर्यंत 5 हजार डॉलरच्या पैजा लागल्या आहेत. सर्वाधिक रक्कम उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर लागली आहे. तर शिक्षण मंत्री बेट्से डेवॉस आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुख्य सचिव स्टीवन मनुचिन यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आली आहे.
एका अमेरिकी अधिकाऱ्याने 'आई एम पार्ट ऑफ रेजिस्टेंस इनसाइड द ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन' या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये या अधिकाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते.