काठमांडू : हिमालयाचे शिखर सर करण्यास चढाई करणारे हजारो जण विनाशकारी भूकंपानंतर बेपत्ता झाले आहेत. त्यात युरोपातील फ्रान्स, इटली आणि स्पेनच्या २२१ गिर्यारोहकांचा समावेश आहे. भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या ७ हजारांवर तर जखमींचा आकडा १४ हजारांवर गेला आहे. नेपाळमध्ये अद्यापही ५ हजार लोक बेपत्ता आहेत. ढिगारे उपासण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.हिमालयातील गिर्यारोहण जगभरातील गिरीप्रेमींना खुणावते. लांगनांग नॅशनल पार्कमधूनही अनेक मार्ग हिमालयात विविध शिखरांवर चढाईसाठी वापरले जातात. या मार्गावर २३ आणि २४ एप्रिल रोजी गेलेल्या किमान हजारांहून अधिक गिर्यारोहकांचा थांगपत्ता लागलेला नाही. भारतीय वायुसेनेला एका गिर्यारोहकांच्या तुकडीला काठमांडूपर्यंत सुरक्षित आणण्यात यश आले आहे.
हजारो गिर्यारोहक बेपत्ता
By admin | Published: May 03, 2015 5:23 AM