जर्मनीत वाहन गर्दीत घुसवल्याने तीन ठार, २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:33 AM2018-04-08T01:33:19+5:302018-04-08T01:33:19+5:30

जर्मनीच्या मुएन्स्तर शहरात पादचाऱ्यांत शनिवारी दुपारी वाहन घुसवल्यामुळे तीन जण ठार व २० जण जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 Three people were killed and 20 others injured in a vehicle in Germany | जर्मनीत वाहन गर्दीत घुसवल्याने तीन ठार, २० जण जखमी

जर्मनीत वाहन गर्दीत घुसवल्याने तीन ठार, २० जण जखमी

Next

बर्लिन : जर्मनीच्या मुएन्स्तर शहरात पादचाऱ्यांत शनिवारी दुपारी वाहन घुसवल्यामुळे तीन जण ठार व २० जण जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नंतर या वाहन चालकाने त्याच वाहनात आत्महत्या केली, असे पोलीस आणि स्थानिक प्रसार माध्यमांनी सांगितले.
ही घटना हल्ला असल्याचे मानले जात असल्याचे जर्मन अधिकाºयांनी म्हटले परंतु, त्याला सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही व हल्ल्याचा हेतूही समजलेला नाही. शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख आहे.
अलीकडच्या काळात जर्मनीत अतिरेकी हल्ल्यांची संख्या वाढली आहे. यात हल्ल्यासाठी वाहनांचा उपयोग करण्यात येत आहे. १९ डिसेंबर २०१६ रोजी ट्यूनिशियाचा नागरिक अनीस अमरी (२४) याने एका ट्रकचे अपहरण करुन बर्लिनमध्ये एका बाजारपेठेत वाहन घुसविले होते. यात १२ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४८ नागरिक जखमी झाले होते. अनीस याला चार दिवसांनंतर पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले होते. यूरोपमधील अनेक अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी इसिसने यापूर्वी घेतलेली आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये बार्सिलोनातील हल्ल्यात १४ ठार तर, १०० हून अधिक जखमी झाले होते. फ्रान्सच्या नाइस शहरात २०१६ मध्ये हल्लेखोराने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात ८६ जण ठार झाले होते.

- आॅगस्ट २०१७ मध्ये बार्सिलोनातील हल्ल्यात १४ ठार तर, १०० हून अधिक जखमी झाले होते. फ्रान्सच्या नाइस शहरात २०१६ मध्ये हल्लेखोराने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात ८६ जण ठार झाले होते.

Web Title:  Three people were killed and 20 others injured in a vehicle in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात