डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं नवीन काम, लवकरच दिसणार 'या' अवतारात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:21 PM2021-09-09T18:21:05+5:302021-09-09T18:29:54+5:30
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना रेसलिंग आणि बॉक्सिंगची प्रंचड आवड आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवीन छंद जोपासला आहे. ट्रम्प आता बॉक्सिंग सामन्यात कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. या सामन्यात माजी हेवीवेट चॅम्पियन इव्हँडर होलीफील्डचा सहभाग असेल. ट्रम्प यांच्यासोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड जूनियरदेखील असेल. हॉलीवूडमध्ये होणाऱ्या या सामन्याचे लाइव्ह फीड FITI.TV वर उपलब्ध होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे खेळावरील प्रेम जगजाहीर आहे. खेळामध्ये विशेषतः बॉक्सींग आणि रेसलिंग त्यांना प्रचंड आवडते. यापूर्वीही त्यांना वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंट म्हणजे WWE मध्ये पाहिले गेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी कॉमेंट्री केली होती. आता परत एकदा ते बॉक्सिंग सामन्यात कॉमेंट्री करण्यास सज्ज झाले आहेत.
https://t.co/GUGy9di4jI
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
वाराणसी दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता.#GyanvapiMasjid#varanasihighcourt
याबाबत सांगताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मला नेहमीच महान खेळाडू आणि खेळाविषयी विशेष आकर्षण आहे. मी शनिवारी रात्री अशाच एका सामन्याचा भाग होतोय. त्या ठिकाणी मी कॉमेंट्री करेन. हा सामना तुम्ही चुकवू नका.' दरम्यान, सामना आधी लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर दे ला होया आणि व्हिटर बेलफोर्टदरम्यान होता. पण, डे ला होयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर ऐनवेळी होलीफील्डला संधी देण्यात आली. होलीफील्डच्या वयाचा हवाला देत कॅलिफोर्निया राज्य एथलेटिक आयोगाने सामन्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता हा सामना फ्लोरिडामध्ये होईल. होलीफील्ड पुढच्या महिन्यात 59 वर्षांचे होणार आहेत. 2011 पासून त्यांनी एकही सामना खेळलेला नाही.