ब्रिटनमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ड्युटीवर असताना कारमध्ये शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. ज्यानंतर त्यांच्यावर विभागाने कारवाई केली. चौकशीसाठी बसवण्यात आलेल्या पॅनलमध्ये महिला आणि पुरूष पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दोघेही सोबत ड्युटीवर तैनात होते. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण....
'द सन यूके' च्या रिपोर्टनुसार, Surrey Police ची महिला पोलीस अधिकारी रिचर्ड पॅटन आणि तिचा प्रियकर एडवर्ड दोघेही एकत्र ड्युटीवर तैनात होते. यादरम्यान त्यांना दोन फोन कॉल आले होते. एक कॉल चोरीचा आणि एक हॉस्पिटलमधून आला होता. पण दोघांनीही काहीही रिस्पॉन्स दिला नाही. (हे पण वाचा : 30 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारानं अचानक केलं आत्मसमर्पण, जाणून घ्या कारण...)
या दोघांच्या बॉसला दोघांवर आधीच संशय होता की, त्यांच्यात अफेअर सुरू आहे. यामुळेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीत एक सीक्रेट डिवाइस लावण्यात आलं होतं. ज्यात त्यांचे आवाज रेकॉर्ड झाले.
ड्युटीवर असताना पॅटन आणि एडवर्ड आपल्या पोलीस कारमध्ये संबंध ठेवत होते. यादरम्यानच त्यांना मदतीसाठी फोन कॉल आले होते. पण त्यांनी हॉस्पिटलमधील कॉल आणि चोरीच्या कॉलकडे दुर्लक्ष केलं. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, असं झालं कारण ते दोघेही संबंध ठेवण्यात व्यस्त होते.
पब्लिक प्लेसमध्ये पोलीस कारमध्ये अधिकाऱ्यांच्या संबंध ठेवण्याच्या आरोपात दोघांवरही विभागीय चौकशी सुरू झाली. चौकशीत ऑन ड्युटी सरकारी गाडीत संबंध ठेवण्याचा आरोप सिद्ध झाला. चौकशी अधिकाऱ्यांना आढळलं की, संबंध ठेवत असताना दोघांचं बोलणं रेकॉर्ड झालं होतं. ज्यात ते आक्षेपार्ह भाषेचा वापर करत होते.
चौकशीनंतर पॅटन आणि एडवर्ड दोघांनीही नोकरीचा राजीनामा दिला. रिपोर्टनुसार, ही काही अशाप्रकारची पहिलीच घटना नाही. याआधीही पोलीस विभागातील अशा घटना समोर आल्या आहे.