US Election : "निवडून आलो तर अमेरिकावासीयांना देणार मोफत कोरोनाची लस"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 05:33 PM2020-10-24T17:33:57+5:302020-10-24T17:55:09+5:30
US Election And Corona Vaccine : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. असंच आश्वासन आता अमेरिकेत देखील देण्यात आलं आहे.
वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. असंच आश्वासन आता अमेरिकेत देखील देण्यात आलं आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी आपण निवडून आलो तर कोरोनाची लस मोफत देण्यात येईल असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी ही एक राष्ट्रीय योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून बायडन यांनी ट्रम्प प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे.
भारत, रशिया आणि चीनवर साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/B8NiR1sfWz#DonaldTrump#America#Indiapic.twitter.com/Oy9jy3ah70
— Lokmat (@MiLOKMAT) October 23, 2020
'अमेरिकेत कोरोना व्हायरसचा सामना करण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरलं आहे. कोरोनाच्या या लढ्यात त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, हार पत्करली आहे' असं ज्यो बायडन यांनी म्हटलं आहे. जेव्हा कोरोना व्हायरसवरील सुरक्षित लस येईल तेव्हा अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीचा विमा नसेल त्याला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. जर मी निवडणूक जिंकलो तर कोरोनासोबत लढण्यावर सगळे लक्ष केंद्रित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन जिंकल्यास त्या निकालाला विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात आव्हान देण्याचीही शक्यता आहे. कोरोना साथीला फार महत्त्व न देणाऱ्या तसेच विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाच जेव्हा त्या संसर्गाची बाधा झाली त्यावेळी रिपब्लिकन पक्ष हादरला होता.
ट्रम्प यांच्या पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही घेतली Actionhttps://t.co/9SLYGakz0W#DonaldTrump#Facebook#Twitter#America#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2020
US Election : बायडन जिंकल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात जाण्याची शक्यता
राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आलेला असताना ट्रम्प यांची प्रचार मोहीम थंडावणे त्या पक्षाला मानवणारे नव्हते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रुग्णालयात काही दिवसच राहून पुन्हा प्रचार मोहिमेत उडी घेतली. ज्यो बायडन यांची जिंकण्याची शक्यता ट्रम्प यांच्यापेक्षा 17 टक्क्यांनी अधिक आहे, असा निष्कर्ष ओपियम रिसर्च व गार्डियनने केलेल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला होता. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी "मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात" असं वादग्रस्त विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं.