वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील मत मोजणीदरम्यान विरोधी पक्षावर निवडणुकीत 'चोरी'चा आरोप करत एक ट्विट केले. ट्विटरने हे ट्विट आपल्या पॉलिसीचा हवाला देते फ्लॅग केले आहे.
जो बायडन यांच्याशी चुरशीची लढत सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की "आपण फार पुढे आहोत, मात्र ते निवडणुकीत चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना हे कधीही करू देणार नाही. मतदान झाल्यानंतर मत दिले जाऊ शकत नाही."
ट्रम्प यांचे हे ट्विट ट्विटरने आपल्या पॉलिसीप्रमाणे फ्लॅग केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे ट्विट निवडणुकीदरम्यान वादग्रस्त आणि भ्रम पसरवणारे असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
ट्विटरच्या या कारवाईमुळे ट्रम्प यांचे ट्विट वाचले तर जाऊ शकते. मात्र, यावर कुणीही आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा याला लाईकदेखील करू शकत नाही. मात्र, हे ट्विट कोट केले जाऊ शकते.
मतमोजणीत घोटाळा, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार - ट्रम्प -आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. पण पेन्सिल्वेनियात रात्रभर मतमोजणी कशासाठी सुरू आहे? मतमोजणीत घोटाळा झाला असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मोठ्या राज्यांनी चित्र पालटले आहे. टेक्सास, फ्लोरिडा, ओहायोत ट्रम्प विजयी झाले असून मिशिगन, पेन्सिल्वेनियात ट्रम्प आघाडीवर आहेत. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, ज्यो बायडन यांच्या खात्यात 236 इलेक्टोरल मते तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात 213 इलेक्टोरल मते आहेत.