अमेरिकेतील फेमस इन्स्टाग्राम मॉडलची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मॉडलच्या घरातूनच तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यासोबतच पोलिसांना एक जखमी व्यक्तीही आढळून आला. ज्याला हत्येचा आरोपी मानलं जात आहे. मॉडलच्या वडिलांनी सांगितलं की, जेव्हा त्यांच्या मुलीने अनेक दिवस फोन केला नाही तेव्हा ते तिच्या घरी पोहोचले. इथे त्यांना दिसलं की, त्यांची मुलगी पायऱ्यांजवळ पडली आहे आणि वरच्या रूममध्ये एक जखमी व्यक्ती आहे. ज्याने भिंतीवर अनेक मेसेज लिहिले आहेत.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम मिस मर्सिडीज मोरचा मृतदेह गेल्या रविवारी टेक्सास येथील तिच्या घरात आढळून आला. मोरचे वडील मार्क गॅग्निअर जेव्हा मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना ती मृत आढळून आली. तर वरच्या रूममद्ये तिला ३४ वर्षीय केविन एकॉर्टो जखमी अवस्थेत आढळून आला. ज्याने मोरच्या लिपस्टिकने रूममधील भींतीवर काही तरी लिहिले होते. गॅग्निअर म्हणाले की, 'माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि एकार्टो तडफडत होता. मी लगेच पोलिसांना कॉल केला'.
मॉडलवर नाराज होता आरोपी?
आपली तरूण मुलगी गमावल्यावर मार्क गॅग्निअर यांनी सांगितलं की जेव्हा ते वरच्या रूममध्ये गेले तेव्हा त्यांना दिसलं की, भींतीवर आणि दरवाज्यावर अनेक मेसेज लिहिले होते. ज्यातून समजतं की, एकॉर्टो त्यांच्या मुलीवर नाराज होता आणि त्यामुळे तिची हत्या केली. पोलीस अजूनही कोणत्या निष्कर्षावर पोहोचले नाहीत. ते हे शोधत आहेत की, मॉडल आणि आरोपीत काय कनेक्शन होतं. दोघे रिलेशनशिपमध्ये होते का?
वॉलवर लिहिले हे मेसेज
मार्क गॅग्निअरनुसार, भींतीवर लिहिलं होतं की, 'माझा वापर करण्यात आला आहे. तिच्यावर प्रेम केलं नसतं तर बरं झालं असतं'. एका मेसेजमध्ये लॅंडलॉर्ड माफीही मागितली आहे. ते म्हणाले की, 'माझ्या मुलीचे लाखो फॉलोअर्स होते. मला नेहमीच भीती होती की, तिला कुणीतरी नुकसान पोहोचवेल. तेच झालं. मी तिला संभावित धोक्याबाबत इशाराही दिला होता'.
आरोपीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू
पोलिसांनी सांगितलं की, मॉडलचा मृत्यू गळा दाबल्याने आणि जखमांमुळे झाला आहे. तर केविन एकॉर्टोचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने आत्महत्येच्या उद्देशाने स्वत:वर चाकूने वार केले होते. पोलीस याचा शोध घेत आहेत की, एकॉर्टो मॉडलच्या घरी कसा पोहोचला. मृतकाच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांची मुलगी तिचं गॅरेज नेहमीच उघडं ठेवत होती. तो तेथूनच आला असेल.