युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:48 PM2020-07-22T16:48:11+5:302020-07-22T16:52:57+5:30
दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं दिली आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या आदेशानंतर दूतावासाच्या आतून धूर दिसून येत आहे. अशी माहिती आहे की, चिनी कर्मचारी गोपनीय कागदपत्रे दूतावासात जाळत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं दिली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ह्युस्टन पोलीसदेखील वकिलातीबाहेर जातात, पण मुत्सद्दी हक्कांमुळे ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. पोलिसांनी सांगितले की, दूतावासातून धूर निघत असल्याचं पाहून लोकांनी त्यांना माहिती दिली, त्यानंतर ते तेथे आले, पण चिनी अधिका-यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. शीतयुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने पहिल्यांदाच कोणत्या तरी देशाला दूतावास बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ह्युस्टनचे वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
अधिकारी गोपनीय फाइल्स जाळत आहेत
इतक्या अल्पावधीत वाणिज्य दूतावास रिकामे करण्याच्या आदेशाने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला धक्का बसला आहे. अमेरिकेच्या आदेशानंतर चिनी दूतावासात गोंधळाचे वातावरण होते. एवढेच नव्हे, तर चिनी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गोपनीय कागदपत्रे जाळताना दिसत आहेत. कर्मचार्यांची कागदपत्रे जाळण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. जर अमेरिकेने हा चुकीचा आदेश मागे घेतला नाही, त्याचा 'न्याय्य व आवश्यक सूड' घेतला जाईल. दूतावातातून येणारे आगीचे लोट पाहिल्यानंतर ह्युस्टन अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचली, परंतु ती दूतावासाच्या आत गेली नाहीत. अमेरिकेच्या या निर्णयाने चीनशी असलेले त्याचे संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे.#BREAKING Beijing says US ordered it to close Chinese consulate in Houston pic.twitter.com/jM0ymvYDdw
— AFP news agency (@AFP) July 22, 2020
हेही वाचा
LICच्या 'या' योजनेवर मिळतेय 15 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त एकच अट!
CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ
सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार
लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत
म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...
चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार
कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार
UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार
फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'
देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार