US Visa: कलम २२१(जी) अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारल्यास काय करावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 01:10 PM2021-09-18T13:10:09+5:302021-09-18T13:12:12+5:30
US Visa: अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारण्यात आल्यानंतरची प्रक्रिया काय?
प्रश्न: अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारण्यात आल्याचं पत्र मला अमेरिकन दूतावासाकडून मिळालं. मला ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याचा नेमका अर्थ काय? मी ऑनलाईन अपॉईंटमेंट कशी घ्यावी आणि मुलाखतीसाठी मला कुठे जावं लागेल?
उत्तर: कलम २२१ (जी)च्या अंतर्गत विविध कारणांमुळे व्हिसा अर्ज रद्द होतो. दूतावासाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा अर्जाबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास अशा प्रकारे अर्ज रद्द होतो. उदाहरणार्थ, फिंगरप्रिंट्स, अपडेटेड कागदपत्रं किंवा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला माहितीबद्दल स्पष्टता हवी असल्यास दूतावास अर्जदाराला मुलाखतीची वेळ निश्चित करायला सांगतो.
कलम २२१ (जी)च्या अंतर्गत तुमचा अर्ज रद्द झाला असल्यास आणि तुम्हाला ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यास सांगितलं असल्यास, कृपया पत्रात देण्यात आलेल्या लिंकवर, www.ustraveldocs.com जा आणि तुम्ही जिथे अर्ज भरलाय, त्या पदाचं नाव निवडा. उदारहणार्थ, तुम्ही अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासात अर्ज केला असल्यास, तर मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेताना 'मुंबई'चा पर्याय निवडा.
२२१ (जी) मुलाखतीसाठी तुम्हाला व्हिसा अर्ज केंद्रात मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. कोणत्याही दूतावासात २२१ (जी) अपॉईंटमेंट घेण्यासाठी शुल्काची आवश्यकता नसते. अपॉईंटमेंट घेताना अडचण असल्यास, तुम्ही india@ustraveldocs.com वर लिहू शकता किंवा कस्टमर सपोर्ट टीमला कॉल करू शकता. भारताकडून: 91-120-484-4644 किंवा 91-022-6201-1000 (सोमवार ते शुक्रवार, सकाळी 8 ते संध्याकाळी ५ पर्यंत, भारतीय प्रमाण वेळ (आयएसटी), रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत, भारतीय प्रमाण वेळ. अमेरिकेकडून: 1-703-520-2239 (रविवारी रात्री 10:30 ते शुक्रवारी सकाळी ७.३० पर्यंत, पूर्व प्रमाण वेळ (ईएसटी).
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.