#Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 08:08 PM2017-12-07T20:08:22+5:302017-12-07T20:15:48+5:30

बर्फाने गोठलेल्या नदीमध्ये हा कुत्रा चुकून पडला आणि त्यानंतर तो तिथे आणखी फसत गेला.

#Video: fire brigade rescued dog caught in frozen river in london | #Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

#Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

googlenewsNext
ठळक मुद्दे लंडनच्या एका शहरात या कुत्र्याच्या मालकाने त्याला बाहेर जाण्यास परवानगी दिली. चालताना त्या कुत्र्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या बर्फातच अडकून राहिला. हा प्रकार जेव्हा समजताच कुत्र्याच्या मालकाने त्वरीत अग्निशमक दलाला पाचारण केलं.

लंडन : बर्फाच्या नदीत अडकलेल्या एका कुत्र्याला अग्निशामक दलातील जवांनानी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं आणि बाहेर काढलं. बर्फावर आडवे होत अग्निशमक दलातील जवानांनी कुत्र्याला वाचवल्यामुळे हे जवान आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनच्या एका शहरात या कुत्र्याच्या मालकाने त्याला बाहेर जाण्यास परवानगी दिली. तेव्हा हा कुत्रा थेट नदीच्या किनारी आला. नदीत संपूर्णपणे बर्फ तयार झाला होता. त्यामुळे कुत्र्याने या बर्फावरून चालण्याचा प्रयत्न केला. मात्र चालतानाच त्याचा पाय घसरला आणि तो बर्फातच अडकून राहिला. त्याला बाहेर येणंही कठीण झालं होतं. हा प्रकार जेव्हा कुत्र्याच्या मालकाला दिसला तेव्हा त्यांनी त्वरीत अग्निशमक दलाला पाचारण केलं. काहीच अवधीत हे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

नदीच्या मधोमध अडकलेल्या कुत्र्याला वाचवणं फार कठीण होतं. त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज होती. युक्ती लढवत या जवानांनी एका जवानाला रश्शीने बांधून घेतलं. रश्शीने बांधून घेतलेला जवान बर्फाच्या नदीवरून आडवा होत पुढे गेला. थोडं अंतरावर गेल्यावर त्याने कुत्र्याला पकडलं देखील. मात्र कुत्र्याला पकडल्यावर तो कुत्रा आणखी बर्फात रुतत गेला.

रुतलेल्या कुत्र्याला काढण्यासाठी प्रयत्न करणारा जवानही खाली रुतला गेला. मात्र अग्निशामक दलातील जवानाने त्याला खेचून बाहेर काढलं. कुत्र्याला पकडल्यावर बाहेर उभ्या असलेल्या जवानांनी रश्शीने खेचून त्या  दोघांनाही बाहेर काढलं. बर्फामुळे कुत्रा बराच गारठला होता. त्यामुळे जवानांनी त्याला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलं. बाहेर येताच त्याने आपल्या मालकाकडे धाव  घेतली. मालकानेही आपल्या गारठलेल्या कुत्र्याला लगेच मिठीत घेतलं. 

हा व्हिडिओ त्या फायर डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी डेनिस पिलोन यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. हा फोटो अपलोड झाल्यावर लंडनमध्ये बराच व्हायरलही झाला. याचसोबत फायर डिपार्टमेंटकडून खबरदारीची सूचनाही देण्यात आली आहे. नदीवर बारीक बर्फाचे थर जमा होत असल्याने आपल्या प्राण्यांना आणि लहान मुलांना बाहेर सोडू नये आणि सोडल्यास त्यांच्यावर देखरेख ठेवावी. नाहीतर हा कुत्रा ज्याप्रमाणे नदीत फसला त्याचप्रमाणे इतरजणही फसण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी

Web Title: #Video: fire brigade rescued dog caught in frozen river in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.