कॅनडात शिकायला जायचेय? 700 विद्यार्थ्यांना तेथील सरकार भारतात पाठवून देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:01 AM2023-06-07T10:01:27+5:302023-06-07T10:01:39+5:30
या विद्यार्थ्यांनी बनावट ऑफर लेटर दाखवून येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे हे विद्यार्थी कॅनडामध्ये आंदोलनाला बसले आहेत.
कॅनडामधून मोठी बातमी येत आहे. जवळपास ७०० भारतीय विद्यार्थ्यांना तेथील सरकार माघारी पाठवून देण्याची तयारी करत आहे. या विद्यार्थ्यांनी बनावट ऑफर लेटर दाखवून येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे हे विद्यार्थी कॅनडामध्ये आंदोलनाला बसले आहेत. इकडे पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांनुसार त्यांना फसविण्यात आले आहे. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाहीय. कॅनडाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या लवप्रीत सिंग हिला १३ जूनला भारतात पाठवून दिले जाणार आहे.
पंजाब एनआरआय प्रकरणांचे मंत्री कुलदीप सिंग धारीवाल यांनी केंद्राला यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या ७०० विद्यार्थ्यांमध्ये अधिकतर पंजाबी आहेत. हे सर्व कॅनडामध्ये इमिग्रेशन फ्रॉडमध्ये अडकले आहेत. एस जयशंकर यांना यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल एजंटना शिक्षा करण्यासाठी केंद्राने पंजाब सरकारला सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी भेटीची वेळही मागितली आहे जेणेकरून संपूर्ण प्रकरण वैयक्तिकरित्या भारत सरकारच्या निदर्शनास आणता येईल, असे धालीवाल म्हणाले. मानवी तस्करी रोखण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये कायदा कठोर असावा. भविष्यात समस्या नाही, घटना घडू नयेत, असे ते म्हणाले.