आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ, उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:52 PM2017-10-12T16:52:53+5:302017-10-12T16:55:26+5:30

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे.

War with us is a fiery game, North American warnings of America | आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ, उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ, उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

Next

प्योंगयांग- उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर कोरियासोबत युद्ध करणे म्हणजे आगीच्या ज्वाळांसोबत खेळण्यासारखं आहे. अमेरिकेला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग म्हणाले, आम्ही आण्विक शस्त्र क्षेत्रात पूर्णतः शांती व सुरक्षेची हमी देतो. मात्र हा चर्चेचा विषय नाही. आमच्यासोबत कोणीही आण्विक शस्त्रास्त्रांसंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-ऊन यांनी सुरू ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या चाचण्या आणि अमेरिकेविरोधातील शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही दम द्यायला सुरुवात सुरूच ठेवली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेने आपली शक्तिशाली बॉम्बर विमाने किम जोंग-ऊनच्या भूमीवरून उडविली होती.
उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक क्षेपणास्त्र आणि अणु चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुकडीशी ‘अनेक पर्यायांवर’ चर्चा केली. त्याचवेळी ही विमाने उत्तर कोरियावर घिरट्या घालत होती. उत्तर कोरियाने यावर्षी फेब्रुवारीपासून 15 चाचण्यांत 22 क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्र चाचणी थांबवा, अन्यथा परिणाम वाईट होती, या अमेरिकेच्या धमकीला न बधता उत्तर कोरियाचे किम जोंग-ऊन यांनी चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मंगळवारी संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस आणि अमेरिकेचे जॉर्इंट चीफ आॅफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांच्यासह वरिष्ठ सल्लागारांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली होती.

येत्या काळात तणातणी आणखी वाढणार-उत्तर कोरियाकडून कोणत्याही स्वरुपात आक्रमण झाल्यास कशा प्रकारे प्रतिकार करता येईल आणि गरज भासल्यास उत्तर कोरियाला कसे रोखता येईल याच्या अनेक पर्यायांवर यावेळी चर्चा झाली, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. एकूण अमेरिकेने उत्तर कोरियाच्या चाचण्यांची घेतलेली दखल आणि त्या देशावरून बॉम्बर विमानांची उड्डाणे यांमुळे तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: War with us is a fiery game, North American warnings of America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.