कोरोनाचे सावट पूर्णतः दूर झालेले नसले, तरीही जगभरात सर्वत्रच नेहमीचे व्यवहार सुरू करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जात आहेत. परदेशात शिकायला जाणाऱ्या भारतीय मुला-मुलींच्या घरातही आता प्रवासाची तयारी सुरू झाली असून ही मुले लवकरच युरोप-अमेरिकेच्या दिशेने उडतील. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रसिद्ध होणारे ‘जगातील सर्वोत्तम विद्यापीठांचे रँकिंग’ आले आहे. या यादीवर अर्थातच वरचश्मा आहे तो अमेरिका आणि युरोपातील विद्यापीठांचा! पहिल्या चौदा जागा युरोप आणि अमेरिकेने पटकावल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा, वैविध्य, जागतिक स्तरावरील संशोधनात सहभाग आणि अभ्यासक्रमांचा व्यावसायिक आस्थापनांशी असलेला संबंध असे निकष लावून ही यादी तयार केली गेली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी - ९५.७
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - ९५.०
हार्वर्ड युनिव्हर्सिटी - ९५.०
स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी - ९४.९
युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज - ९४.६
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - ९४.६
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी - ९३.६
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली - ९२.२