US Visa मुलाखतीची प्रक्रिया नक्की कशी असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 11:58 AM2017-10-10T11:58:02+5:302017-10-10T13:47:18+5:30
मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो
प्रश्न - व्हिसा मुलाखतीसाठी माझी पुढील आठवड्यात वेळ ठरली आहे. मी कॉन्सलेटमध्ये आल्यावर काय प्रक्रिया असते?
मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो. पासपोर्ट, अपॉइंटमेंट लेटर व अन्य आवश्यक ती कागदपत्रं बरोबर घेऊन यावं.
आमचे कर्मचारी तुमचं कॉन्सलेट बाहेर स्वागत करतील, तुमची कागदपत्रं तपासतील आणि सुरक्षा तपासणी करतील. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये नेण्यात येईल व थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात येईल.
ज्यावेळी तुमच्या मुलाखतीची वेळ येईल त्यावेळी कर्मचारी तुम्हाला व्हिसा हॉलमध्ये नेतील. तुमच्या प्रथम फिंगरप्रिंट घेऊन ओळख पटवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या रांगेत जाण्यास सांगितले जाईल. अमेरिकी कॉन्सलर ऑफिसर तुमची मुलाखत घेईल. ही मुलाखत साधारणपणे 2 ते 3 मिनिटांची असेल. ती आटोपल्यावर अधिकारी तुम्हाला निर्णय सांगेल व आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्ही जाण्यास मोकळे असाल.
काही गोष्टी याठिकाणी आणण्यास सक्त मनाई आहेत, याची नोंद घ्यावी. आणि मुलाखतीच्यावेळी अशा वस्तू ठेवण्यासाठी काही सोयही नाहीये. कुठल्या गोष्टी बरोबर आणता येतील आणि कुठल्या वर्ज्य आहेत याची यादी www.ustraveldoc.com/in येथे दिलेली आहे. या वेबाईटवर मुलाखतीच्या प्रक्रियेचा एक छोटा व्हिडीयोही आहे, तो बघावा.