अमेरिकेतील प्रवासादरम्यान टुरिस्ट/बिझनेस व्हिसाची मुदत संपल्यास काय होऊ शकतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 05:29 PM2019-10-26T17:29:33+5:302019-10-26T17:31:29+5:30
अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाची मुदत 2 आठवड्यांच्या अमेरिकेतील सुट्टी दरम्यान संपणार आहे. यामुळे काही समस्या उद्भवणार नाही ना? जाणून घ्या...
प्रश्न - माझ्या अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाची मुदत 2 आठवड्यांच्या अमेरिकेतील सुट्टी दरम्यान संपणार आहे. यामुळे काही समस्या उद्भवणार नाही ना?
उत्तर - नाही. तुमच्या बिझनेस/टुरिस्ट व्हिसाची मुदत तुम्ही अमेरिकेत असताना संपल्यास कोणतीही अडचण येत नाही. अमेरिकेचा व्हिसा तुम्हाला देशात प्रवेश करताना गरजेचा असतो. त्याच्या आधारे तुम्ही अमेरिकेत प्रवेश करण्याची विनंती करू शकता. व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारची विनंती करू शकता.
अमेरिकेत तुम्ही किती काळ राहू शकता याचा निर्णय डिपार्टमेंट ऑफ होमland सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) ऑफिसर देशात प्रवेश करताना घेतात. सीबीपी ऑफिसर तुमच्या पासपोर्टवर तुम्ही ज्या दिवशी अमेरिकेत प्रवेश करत आहात ती तारीख, व्हिसाचा प्रकार आणि तुम्ही देशात कधीपर्यंत मुक्काम करू शकता याची माहिती नमूद करतो. तुम्ही हवाई किंवा समुद्री मार्गाने अमेरिकत दाखल झाल्यास तुम्हाला प्रवेशाची माहिती देणारी वेगळी कागदपत्रं दिली जात नाहीत. तुमच्या अमेरिकेतील प्रवेशाची/निघण्याची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवली जाते. तुम्ही ही माहिती http://i94.cbp.dhs.gov वर तपासून पाहू शकता.
सीबीपी अधिकारी तुम्ही अमेरिकेत प्रवेश करताना तुम्ही किती दिवस देशात राहू शकता त्याची माहिती नमूद करतात. त्यापेक्षा अधिक दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार नाही याची काळजी घ्या. दिलेली मुदत ओलांडून गेल्यावरही तुम्ही अमेरिकेत राहिलात, तर याचा परिणाम भविष्यातील व्हिसाच्या पात्रतेवर होऊ शकतो.
तुमच्या व्हिसाची मुदत संपली असल्यास अमेरिकेत जाण्यापूर्वी त्याचं नूतनीकरण करा. याची प्रक्रिया www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन सुरू करताकरता येईल.