व्हिटो पावर म्हणजे काय ? चीनला कसा मिळाला हा विशेषाधिकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:02 PM2019-03-14T13:02:24+5:302019-03-14T13:03:37+5:30
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता
व्हिटो पावर म्हणजे काय ?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत कोणताही प्रस्ताव पारित करण्यासाठी 9 मतांची गरज असते. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या नियमांनुसार प्रस्ताव पारित करण्यासाठी लागणाऱ्या 9 मतांपैकी एक मत हे स्थायी सदस्यांनी संमतीने घेतलेल्या एका मतावर अवलंबून असतं. या स्थायी सदस्यांना कोणत्याही प्रस्तावाला नाकारण्याचा अधिकार देण्यात आलेला असतो. ही व्हिटो पावर म्हणजे नकाराधिकार
अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व चीन ही पाच राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्य आहेत. दहा अस्थायी सदस्य राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांना नकाराधिकार असतो. कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
1950 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य होण्याची संधी मिळाली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ही संधी नाकारल्यामुळे भारत ऐवजी चीनला स्थायी सदस्य म्हणून संधी मिळाली. अनेक वेळा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्न केले मात्र मोठ्या देशांचा पाठिंबा असूनही त्याला यश आले नाही.
चीनने याआधी 2009, 2016 आणि 2017 या साली मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला व्हिटो पावरचा वापर करुन विरोध केला होता
मसूद अझहरला बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समितीमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारीला आणला होता. 2017 मध्येही चीनने अजहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं. मसूद अझहरला पाठिशी घालण्याचे काम चीन नेहमी करत आलाय. त्यावेळी चीनने मसूद अजहर आजारी असून आता तो कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी नसल्याचं सांगितले होते.