कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच जगभरात अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याकडे पाहून हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता याला दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एक ट्वीट करत शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर मोठ्या कालावधीसाठी प्रभाव राहणार असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
"मुलांच्या मनसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर मोठ्या कालावधीसाठी प्रभाव राहिल, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सर्व मोठ्या व्यक्तींच्या लसीकरणासोबतच शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यायला हवं. एकत्र जमा होण्यावर आणि सातत्यानं हात साफ करण्यासारख्या उपयांचाही वापर करण्यात यावा," असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.