बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 05:23 PM2018-08-31T17:23:15+5:302018-08-31T17:23:59+5:30
6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे.
नवी दिल्ली- भारतीय उपखंडामधील देशांसाठी सार्कची स्थापना करण्यात आली आहे. मात्र तरिही आणखी एका संघटनेची म्हणजे बिमस्टेकची निर्मिती का करण्यात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तसेच बिमस्टेकमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्कचे यश अत्यंत मर्यादित आहे. तसेच पाकिस्तानने सार्कमध्ये नेहमीच असहकाराची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवादाला आणि दहशतवादी छावण्यांना मोकळीक दिल्यामुळे भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामुऴे सार्कचे क्षेत्र अत्यंत आकुंचित पावले आहे. त्यामुळेच भारताने बिमस्टेकला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी जर पाकिस्तानने जर आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर पाकला वगळून प्रादेशिक संघटना बनवावी लागेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळेच बिमस्टेकसारखी संघटना उभी राहिली. आज पाकिस्तान भारतीय उपखंडात इतर देशांपासून वेगळा पडल्याचे दिसून येते.
Nepal is honored to host 4th #BIMSTEC Summit in Kathmandu on 30th & 31st Aug. This historic event is expected to strenghten regional ties & foster multi-sectoral economic cooperation among the Member States. We hope this provides a great opportunity for Nepal to promote tourism. pic.twitter.com/48wWAlT5m9
— Rabindra Adhikari (@RabindraADH) August 30, 2018
सात देशांचे बिमस्टेक संघटन
6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. यामध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान, नेपाळ यांचा समावेश होता. नंतर डिसेंबर महिन्यामध्ये त्यात म्यानमारचा समावेश करण्यात आला. या देशांमध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के लोकसंख्या राहाते.
बँकॉक येथे बिमस्टेकच्या गटामार्फत सर्व सदस्य देशांच्या सरकारांशी संपर्क ठेवला जातो. आजवर बिमस्टेकच्या तीन शिखप परिषदा झाल्या आहेत तर मंत्री आणि अधिकारी पातळीवरील अनेक बैठका झाल्या आहेत.
Joining hands to realize the objectives of #BIMSTEC and take it to new heights! PM @narendramodi and other leaders from #BIMSTEC met informally at the Leaders' Retreat today morning in Kathmandu! pic.twitter.com/0Y25KjV9ky
— Raveesh Kumar (@MEAIndia) August 31, 2018
सदस्य देशांच्या नावाच्या क्रमानुसार या संघटनेचे अध्यक्षपद मिळते. सर्वप्रथम बांगलादेशकडे 1997-99 या काळासाठी अध्यक्षपद होते. त्यानंतर म्यानमार 2001-02, श्रीलंका 2002-03, थायलंड 2003-05. बांगलादेश 2005-06 असे अध्यक्षपद होते. भूतानने नकार दिल्यानंतर 2006-09 या कालावधीसाठी भारताकडे या परिषदेचे अध्यक्षपद होते. हे सर्व देश एकमेकांना 14 विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करतील. त्यात टेलिकॉम, गुन्हे तपासणी, कृषी, पर्यावरण, दहशतवाद उच्चाटन, गरिबी निर्मूलन अशा विषयांचा त्यात समावेश आहे. भारत आणि आग्नेय आशियातील देशांचा संपर्क व व्यापार वृद्धींगत होत आहे.
Delighted to welcome you, heads of state & Government, to Kathmandu for 4th Summit of #BIMSTEC, a grouping of increasing importance for us in the region. I do hope our august gathering will give a collective impetus to achieving peace, sustainable development and prosperity.
— KP Sharma Oli (@PM_Nepal) August 30, 2018