भारतात प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची न्यायालयासमोरच धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 08:39 AM2019-11-07T08:39:13+5:302019-11-07T08:49:12+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन येथील न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा फेटाळला.
पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीनन्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. मात्र नीरव मोदीनेन्यायालयासमोरच भारताकडे माझं प्रत्यार्पण केल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली. तसेच तुरुंगातील अन्य कैद्यांकडून मला मारहाण झाल्याचे देखील नीरव मोदीने सांगितले. परंतु या सर्वप्रकारनंतरही न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळून लावली आहे.
नीरव मोदीच्या वकिलांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी तुरुंगातील दोन कैदी त्याच्या जवळ आले व नीरव मोदीला मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याला लुटण्याचा देखील प्रयत्न त्या कैदींनी केला. तसेच याप्रकरणानंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे नीरव मोदीचे वकिल कीथ क्यूसी यांनी सांगितले.
नीरव मोदी मार्च महिन्यापासून इंग्लंडमधील वाँड्सवर्थ तुरुंगात आहे. भारताने ठेवलेल्या आरोपांप्रकरणी स्कॉटलंड यार्डने काढलेल्या प्रत्यार्पण वॉरंटवर नीरवला अटक करण्यात आली होती. पुढील वर्षी मे महिन्यात सुनावणी सुरू होण्यापूर्वी जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नीरव याला लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयापुढे बुधवारी हजर करण्यात आले. हमीची रक्कम दोन दशलक्ष पौंडांवरून चार दशलक्ष पौंड करण्याची तयारी दर्शवूनही न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी त्याचा जामीन फेटाळण्यात आली.