धक्कादायक! कॅम्पमध्ये झोपलेल्या महिलेला टेंटमधून ओढत जंगलात घेऊन गेलं अस्वल आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:24 PM2021-07-09T19:24:57+5:302021-07-09T19:27:21+5:30
मोंटाना फिश वाइल्ड लाइफ अॅन्ड पार्क्स माहितीनुसार, हा हल्ला ६ जुलैला सकाळी ३ वाजून ३० मिनिटांनी ओवांडोच्या एका भागात झाला.
बऱ्याच लोकांना जंगलात सफारी करणं पसंत असतं. पण अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या वाचून अंगावर काटा येतो. अशीच एक घटना मोंटानामद्ये कॅंपिंग दरम्यान एका अस्वलाने टेंटमध्ये झोपलेल्या एका महिलेला बाहेर खेचलं आणि ओढत जंगलात नेऊन तिचा जीव घेतला.
मोंटाना फिश वाइल्ड लाइफ अॅन्ड पार्क्स माहितीनुसार, हा हल्ला ६ जुलैला सकाळी ३ वाजून ३० मिनिटांनी ओवांडोच्या एका भागात झाला. सीबीएस न्यूजनुसार ६५ वर्षीय मृत महिलेचं नाव लिआ डेविस लोकन आहे. ती कॅलिफोर्नियाची राहणारी होती. ज्या अस्वलाने महिलेला मारलं त्याचं वजन साधारण ४०० पाउंड होतं. या अस्वलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही महिला काही मित्र-मैत्रिणींसोबत सायकल प्रवासावर निघाली होती. ती जंगलात एका भागात १०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ओवांडो गावात रात्र घालवण्यासाठी एका शिबिरात थांबलेली होती. महिला एका टेंटमध्ये झोपली होती. बाजूच्या टेंटमध्ये दोन लोक झोपले होते. एफडब्ल्यूपी अधिकाऱ्यांनुसार, अस्वल कॅम्प साइटमध्ये फिरताना दिसला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पिंग करत असलेल्या लोकांना सांगण्यात आलं होतं की, त्यांनी झोपण्यापूर्वी त्यांच्या टेंटमधून खाण्याच्या सर्व वस्तू काढून टाकाव्या जेणेकरून प्राणी खाण्याच्या शोधात आत शिरणार नाहीत. सर्व्हिंलांस फुटेजमध्ये एक टेंटबाहेर अस्वल दिसलं आहे.
अधिकारी म्हणाले की, दुसऱ्या टेंटमध्ये असलेलं दाम्पत्य अस्वलाच्या आवाजाने जागं झालं आणि त्यांनी अस्वल महिलेला फरफटत जंगलाकडे नेत असल्याचं पाहिलं. ते लगेच त्याच्यामागे धावत गेले. दाम्पत्याने अस्वलाला फळवण्यासाठी स्प्रेचा वापर केला. त्यानंतर पोलिसांना कॉल केला. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमने काही वेळानंतर महिलेला मृत घोषित केलं.