आईला समजलं होतं कॉलेजमधील एक सीक्रेट, मुलीने निर्दयीपणे केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:42 AM2023-09-27T09:42:01+5:302023-09-27T09:42:18+5:30
हत्येच्या कारणाबाबत सांगितलं जात आहे की, आईला मुलीच्या एका कॉलेज सीक्रेटबाबत समजलं होतं. ज्यानंतर तिने हे कृत्य केलं.
एका तरूणीने आपल्या आईसोबत असं काही केलं, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या तरूणीने चाकूने आपल्या आईवर वार केले आणि फ्राइंग पॅनेही तिला मारलं. जोपर्यंत तिचा जीव गेला नाही तोपर्यंत ती असंच करत राहिली. हत्येच्या कारणाबाबत सांगितलं जात आहे की, आईला मुलीच्या एका कॉलेज सीक्रेटबाबत समजलं होतं. ज्यानंतर तिने हे कृत्य केलं.
ही घटना अमेरिकेच्या ओहियोमधील आहे. 23 वर्षीय सिडनी पॉवेलला आपल्या आईच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं. तिची आई ब्रेंडा पॉवेल 50 वर्षांची होती आणि एक हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करत होती. सिडनीला समजलं की, तिच्या आईला तिच्याबद्दल समजलं की, तिला कॉलेजमधून काढून टाकलं. अशात मार्च 2020 मध्ये सिडनीने आई ब्रेंडाच्या डोक्यावर फ्राइंग पॅनने हल्ला केला. त्यानंतर तिने आईच्या मानेवर चाकूने 30 वेळा हल्ला केला.
पोलिसांना 3 मार्चला ब्रेंडा आपल्या घरात बेशुद्ध अवस्थेत दिसून आली होती. तिला आणि तिच्या 19 वर्षीय मुलीला तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ब्रेंडाचं निधन झालं. त्यानंतर समजलं की, सिडनीनेच आपल्या आईवर हल्ला केला होता.
सिडनीला वाचवण्यासाठी तिचे वकिल म्हणाले की, ती मानसिक आजाराने पीडित आहे. तर दुसरे वकिल म्हणाले की, गुन्हा करताना सिडनी ठीक होती. तिला फक्त एंझायटीसारखी समस्या होती.
सिडनीला 28 सप्टेंबरला शिक्षा सुनावली जाणार आहे. तिला 15 वर्षानंतर संभावित पेरोल मिळू शकेल. पुराव्यांसोबत छेडछाड केल्याबाबत तिला जास्त काळ तुरूंगात रहावं लागू शकतं.