अमेरिकेमध्ये वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाताजाता चीनला जोरदार धक्के दिले आहेत. चिनी सरकारी ऑईल कंपनी चाइना नेशनल ऑफशोर ऑयल कॉर्प (CNOOC) वर कारवाई करताना स्मार्टफोन कंपनी शाओमी Xiaomi Corp ला देखील ब्लॅकलिस्ट केले आहे.
चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. दक्षिण चीन समुद्रात उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनवर दबाव वाढविण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
खोल समुद्रात तेलाचा शोध घेणारी चीनची मोठी सरकारी कंपनी चायना नॅशनल ऑफशोर ऑईल कॉर्पवर बंधने लादताना म्हटले आहे की, कोणत्याही परवानगीशिवाय ही कंपनी अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरू शकत नाही. याआधी डिसेंबर 2020 मध्ये अमेरिकी सरकारने 60 चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले होते.