रोजी गेली तरी १ लाख ५६ हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:31+5:302021-04-23T04:32:31+5:30

तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशनकार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू आणि ...

1 lakh 56 thousand families will get bread | रोजी गेली तरी १ लाख ५६ हजार कुटुंबांना मिळणार रोटी

रोजी गेली तरी १ लाख ५६ हजार कुटुंबांना मिळणार रोटी

Next

तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशनकार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, तसे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे नवे रेशनकार्ड प्राप्त झाले आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

१५ दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. त्यातूनच कोरोनावर मात करता येईल.

योगेश भुतेकर,

हाताला काम नसल्याने घरीच बसून आहोत. आता शासनाने ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे काम मिळणेही कमी झाले आहे. त्यामुळे वर्षभर शासनाने हा निर्णय लागू करावा. याचा गरजू लोकांना फायदा होईल.

किसन काळे

Web Title: 1 lakh 56 thousand families will get bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.