बस-टँकर अपघातात १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:15 AM2018-07-10T01:15:00+5:302018-07-10T01:16:14+5:30
जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात टँकर चालक बसवराज यादव हा गंभीर जख्मी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिल्लोड बस आगारची बस क्रमांक एम. एच. बी. एल. २०८३ ही सकाळी बुलडाणा येथून येत असताना कोल्हापूर पाटीजवळ भोकरदन कडून येणार टँकर क्रमांक एम एच ०४ जी एफ ५३०१ यांच्यात समोरा समोर जोरात धडक होऊन हा अपघात झाला आहे. झालेला अपघात पाहता या मध्ये टँकर चालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली . सकाळची वेळ असल्याने प्रवासी तसे बे सावध होते.मात्र यात काही जिवीत हानी झाली नाही. बस मध्ये प्रवास करणारे विशाल मधुकर जाधव,( रा.माहोरा )केशवराव विनायकराव लहाने ( रा.घाणखेडा )बीबी नारायण सरोदे ( चिंचखेडा )संतोष पांडुरंग राऊत ( रा.बुलढाणा )मनाबाई काळूबा जाधव ( कोल्हापूर )वैशाली पांडुरंग जाधव ( बुलढाणा ) अनंता अशोक लहाने ,विशाल विलास दाके ( मलकापूर )कमल उत्तम लहाने ( म्हसला ) किशोर सुरत्न ( संग्रामपूर ) हे किरकोळ जखमी झाले आहे.
घडलेल्या घटनेची पोलीसांना माहिती मिळताच पोहेका एन. बी. भताने, बी.जी.जाधव, आधार भिसे, जयभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमी प्रवाशांना उपचारासाठी भोकरदन येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांना दिली आहे.