सव्वालाख शेतकरी नवीन कर्जास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:05 AM2018-04-23T01:05:02+5:302018-04-23T01:05:02+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत. त्यामुळे येत्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते-औषधी खरेदीसाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.
राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ७५० कुटुंबांनी आॅनलाइन अर्ज केले होते. जिल्ह्यातील २० बँकांच्या १६२ शाखांमध्ये एक लाख २३ हजार ८५१ शेतक-यांचे ५९३ कोटी ६९ लाख हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यामध्ये दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ९४ हजार ६१० शेतक-यांचा समावेश आहे. तसेच नियमित कर्जफेड करणा-या २८ हजार ८२५ शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ४० कोटी ४७ लाखांची रक्कम शेतक-यांचा खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ हजार ९५८ शेतक-यांना एकरकमी परतफेड योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.