३६५ दिवसांत ४२४ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:40 AM2020-01-26T00:40:12+5:302020-01-26T00:40:34+5:30

: गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत

3 accidents in 5 days | ३६५ दिवसांत ४२४ अपघात

३६५ दिवसांत ४२४ अपघात

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत. यात १८८ जणांचा बळी गेला असून, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाढलेले अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक नियम जागृती आणि नियम मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडाची कारवाई केवळ जुजबी ठरते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
रस्ता अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, पोलीस ठाण्यातील पथके कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह इतर कार्यक्रमांमधून वाहतूक नियमांची जागृतीही प्रशासनाकडून केली जाते. मात्र, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालक वाहने चालवित असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण आजही कायम आहे. सन २०१८ मध्ये वर्षभरात ४०० अपघाताची नोंद जालना पोलिसांच्या दप्तरी झाली होती.
यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर २७९ जण गंभीर जखमी झाले होते. तर ४३ जण किरकोळ जखमी झाले होते. मात्र, गत वर्षभरात २०१९ मध्ये ४२४ रस्ता अपघाताची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यात १८८ जणांचा बळी गेला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मयतांची संख्या घटली असली तरी गंभीर जखमींची संख्या वाढून ३२९ वर गेली आहे. तर ८७ चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
रस्ता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ वाहतूक नियम जागृती आणि दंड आकारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांची दुरूस्ती, धोकादायक वळणे, धोकादायक पूल दुरूस्तीसह इतर उपाययोजनांकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रस्ता अपघातात वाढ होत असून, चालकांनीही स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
गतवर्षी २०१९ मध्ये झालेल्या ४२४ अपघातापैकी १७६ अपघातांत १८८ जणांचा बळी गेला आहे. शिवाय ४० अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.
२०१८ या वर्षभरात एकूण १९१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर ३५ अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.

Web Title: 3 accidents in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.