६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:16 AM2018-12-27T01:16:07+5:302018-12-27T01:16:30+5:30

जिल्ह्यात ६२५ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची कमरता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

625 teachers vacancies; Results on quality ... | ६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम...

६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भावेविण देव न कळे नि:संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. या संत ज्ञानेश्वरांच्या अभगांची आठवण जिल्ह्यातील हजारो विध्यार्थ्यांचे पालक घेत आहेत. याला कारण म्हणजे जेथे त्यांचे पाल्य शिकताय तेथे अध्यापनासाठी गुरुजीच नाहीत. कुठे चार वर्गांना एकच तर कुठे अख्ख्या शाळेला एकच शिक्षक आहे. जिल्ह्यात ६२५ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची कमरता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
एकीकडे शिक्षण विभाग शाळांमधील विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना जेथे विद्यार्थी शिकतात, त्या शाळांना शिक्षक देण्याची मेहरबानी करत नसल्याचे चित्र आठ वर्षांपासून जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळेत सुविधा, गुणवत्ता मिळत असल्याने मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊ लागली आहेत. पण आपला मुलगा जिथे शिकतोय तेथे शिकवण्यासाठी गुरूच नसल्याने जिल्ह्यातील पालक चिंता व्यक्त करीत आहेत.
बदल्या आॅनलाईन झाल्याने अनेक शाळांना एखादा शिक्षक मिळाला तर कुठे मिळालाच नाही. आता बदली प्रकिया संपल्याने व अधिकार नसल्याने अधिकारीही निमूटपणे याकडे पाहत आहेत. जिल्हा परिषद शाळा कात टाकून पसंतीस उतरू लागल्या असताना रिक्त जागांचे ग्रहण मात्र गुणवत्तेवर परिणाम करत आहे. यामुळे शासनस्तरावरूनच याचे उत्तर मिळावे.
जिल्ह्यात शिक्षकांची असलेली कमतरता लवकरच दूर केली जाणार आहे. पवित्र पोर्टलव्दारे ही भरती प्रक्रिया होणार असून, शासनस्तरावरुन या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही पदे भरण्यात येणार आहेत.
- पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

Web Title: 625 teachers vacancies; Results on quality ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.