जालना जिल्ह्यात येणार ७५ शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:57 AM2019-03-06T00:57:59+5:302019-03-06T00:58:26+5:30
बाहेर जिल्ह्यातून ७५ शिक्षक जिल्ह्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आंतर जिल्हा बदली टप्पा तीनमध्ये जालना जिल्ह्यातील ३५ शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करण्यात आली असून, बाहेर जिल्ह्यातून ७५ शिक्षक जिल्ह्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रहार शिक्षक संघटनेने आंतरजिल्हा बदली टप्पा-३ मध्ये रिक्त जागा व साखळी पद्धतीने पदस्थापना देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आंतरजिल्हा बदली आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून बदली झालेल्या शिक्षकांची सांख्यिकीय माहिती जिल्हा परिषदेला कळवण्यात आली आहे.
जिल्ह्यात पूर्वी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असे. जालना जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात बदलून शिक्षकांची संख्या अधिक असायची. मात्र यावर्षी प्रथमच असे घडते आहे की, येणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त व जाणाºया शिक्षकांची संख्या कमी आहे. बीड व औरंगाबाद येथे जागा रिक्त नसल्या कारणाने शिक्षकांनी जालना जिल्ह्यास पसंती दिली असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी दिली. दरम्यान, पैसा व नॉनपेसा या अटीमुळे मोठ्या प्रमाणात बदलीची संख्या घटली आहे. प्रहार संघटनेने यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मे पर्यंत या बदलीच्या यादीत आणखी वाढ निश्चितच होईल, असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरु यांनी सांगितले. दरम्यान आज जरी या बदल्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात या शिक्षकांना त्यांच्या बदली झालेल्या जागेवर सोडताना जेथून दुसºया शिक्षकाची बदली झाली आहे, ते रूजू होण्यास येणार नाहीत, तो पर्यत आहे त्या शिक्षकांना सोडणार नाहीत.