अपहरण प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:24 AM2020-01-04T00:24:14+5:302020-01-04T00:25:57+5:30

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ...

Abduction cases; Three accused arrested | अपहरण प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

अपहरण प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

Next
ठळक मुद्देमहिनाभर केली रेकी : अपहरणाचे दोन प्रयत्न अयशस्वी

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाºया तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री जेरबंद केले. संबंधित अपहरणकर्त्यांनी ‘त्या’ ज्येष्ठ व्यापाºयाच्या दिवसभर होणा-या हलचालींची एक महिनाभर रेकी केली होती. तसेच दोन वेळेस अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तिसºया प्रयत्नात व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
जुना जालना भागातील शिवशक्ती दालमील समोरील रोडवर ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ३० डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झाले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांचा मुलगा दीपक भानुशाली यांच्याकडे ५० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम सेंट मेरी स्कूल जवळ ठेवण्यास सांगण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावर सापळा रचला होता. त्यावेळी व्यापारी खेराजभाई भानुशाली यांची यशस्वी सुटका करण्यात आली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात राहणारा राहूल सुदाम जाधव याने त्याच्या सहकाºयांना सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाºयांनी गुरूवारी कन्हैय्यानगर भागात कारवाई करून राहूल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आपण भरत दशरथ भागडे (रा. लालबाग जालना), अजय उर्फ गट्टू इंदर जांगडे (रा. कन्हैय्यानगर जालना) व इतर एकाला सोबत घेऊन व्यापाºयाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भरत भागडे याला जालना परिसरातून तर अजय जांगडे याला नांदेड परिसरातून जेरबंद केले. संबंधितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, रंजित वैराळ, पोकॉ सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सोमनाथ उबाळे, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे, चालक पोहेकॉ राऊत, पोना पूनम भट्ट यांच्या पथकाने केली.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
ज्येष्ठ व्यापाºयाच्या अपहरण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद केले होते. संबंधितांविरूध्द इतर प्रकरणात चंदनझिरा व कदीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संबंधितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
पाच तास विविध मार्गावर प्रवास
ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्यानंतर संबंधित अपहरणकर्त्यांनी अंबड रोड, बदनापूर रोड, देऊळगाव राजा रोडवर तब्बल पाच तास प्रवास केला. प्रारंभी ५० लाखांची मागणी करणाºया अपहरणकर्त्यांनी शेवटी २ लाख रूपये मिळाल्यानंतर व्यापारी भानुशाली यांना सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई करीत व्यापाºयाची सुटका केली.
५० लाखांची मागणी; मांडवली २ लाखात
ज्येष्ठ व्यापाºयाचे अपहरण केल्यानंतर प्रारंभी अपहरणकर्त्यांनी व्यापाºयाच्या मुलाकडे ५० लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी व्यापाºयाच्या मुलाला विश्वासात घेत सर्व हलचालींची माहिती घेतली. अपहरणकर्ते आणि त्या मुलामध्ये पैशांवर चर्चा होऊन शेवटी २ लाख रूपयांची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. अपहकरणकर्त्यांनी व्यापाºयाला मुख्य रस्त्यावर सोडावे, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
पोलिसांच्या सूचनांचे पालन करणाºया तक्रारदाराचे शेवटच्या टप्प्यात वडिलांच्या काळजीखातर संयम सुटले. त्यामुळे त्यांनी सेंट मेरी स्कूलसमोरील गल्लीत पैसे देण्याची तयारी दर्शविली. पोलिसांनी बॅगमध्ये एक लाख रूपये ठेऊन सापळा रचला होता. व्यापाºयाची सुटका झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते पळून गेले.

Web Title: Abduction cases; Three accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.