जालन्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:50 PM2019-01-15T17:50:48+5:302019-01-15T18:01:35+5:30

यानंतर पोलिसांनी चार गुंडांना ताब्यात घेतले.  

accused attacks on police while combing operation at jalana | जालन्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

जालन्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

Next

जालना : कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांवर एका गुंडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१४ ) मध्यरात्री घडली. यानंतर पोलिसांनी चार गुंडांना ताब्यात घेतले.  

स्थानिक गुन्हे शाखेच्या 14 जणांच्या पथकाने शहरात सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत संशयित आरोपींचा शोध सुरु केला. मध्यरात्री १ वाजेच्या  दरम्यान अट्टल गुन्हेगार तेजसिंग याचा तपास त्याच्या घरात सुरु होता. यावेळी अचानक तेजसिंग याने पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर आणि कर्मचाऱ्यांवर लोखंडी घणाने हल्ला केला. परंतु, गौर व त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान दाखवून प्रतिकार करत त्याला ताब्यात घेतले. 

Web Title: accused attacks on police while combing operation at jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.