जालना : कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांवर एका गुंडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१४ ) मध्यरात्री घडली. यानंतर पोलिसांनी चार गुंडांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या 14 जणांच्या पथकाने शहरात सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत संशयित आरोपींचा शोध सुरु केला. मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अट्टल गुन्हेगार तेजसिंग याचा तपास त्याच्या घरात सुरु होता. यावेळी अचानक तेजसिंग याने पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर आणि कर्मचाऱ्यांवर लोखंडी घणाने हल्ला केला. परंतु, गौर व त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान दाखवून प्रतिकार करत त्याला ताब्यात घेतले.