९७ विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:24 AM2018-04-09T00:24:20+5:302018-04-09T00:24:20+5:30
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे.
या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, जलस्रोत कोरडे पडत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भोकरदन तालुक्यातील १९, जाफराबादमधील १५ आणि परतूर आणि जालना तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टंचाई पाणी टंचाई जानवत असल्याने टँकर सुरू करण्याबरोबर विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता.
त्यानुसार भोकरदन तालुक्यातील १९ गावांसाठी २६, जाफराबाद तालुक्यातील १६ आणि परतूर तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारपर्यंत टँकरच्या दीडश खेपा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजना रखडल्या: मे मध्ये वाढणार टँकरची संख्या
जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांश योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमधी संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढणार असून, प्रशासनाला त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.