लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कायदा व सुव्यवस्था राखणा-या पोलीस अधिकाºयांचे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्ह्यातील १८ कामचुकार अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारत थेट त्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखली आहे. या कारवाईमुळे अधिका-यांमध्ये धास्ती पसरली आहेत.जिल्ह्यात १८ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. या अवैध धंद्यांवर पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांनी कारवाई करणे गरजेचे असते. परंतु, पोलीस अधिकारी या अवैध धंद्यांवर कारवाई करत नाही. त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जाऊन पोलीस अधीक्षकांचे पथक, अपर पोलीस अधीक्षकांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष कृती दलाचे पथक कारवाई करते. अशा जिल्ह्यातील १० पोलीस निरीक्षक व ८ सहायक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.यात पोलीस निरीक्षकांचा अहवाल विशेष महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे, तर सहायक पोलीस निरीक्षकांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली. एकूणच या अधीक्षकांच्या भूमिकेमुळे पोलीस दलात कमालीची दहशत पसरली असून, कामचुकारांची आता खैर नसल्याचे बोलले जाते.गुन्हेगारांना अभय देणा-यांना बसणार चापजिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत होणारी वाढ लक्ष घेता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य हे विविध उपाय योजना करीत आहे. परंतु, पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई होत नाही.त्यामुळेच कारवाई न केलेल्या अधिका-यांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उचला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांना अभय देणाºया पोलीस अधिका-यांना आता चाप बसणार आहेत.जे पोलीस अधिकारी कामचुकारपणा करीत आहे. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. १० पोलीस निरीक्षकांचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे, तर ८ सहायक पोलीस निरीक्षकांवर वेतन वाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक
१८ कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:12 AM