बदनापुरात चार जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:27 AM2021-03-14T04:27:25+5:302021-03-14T04:27:25+5:30
बदनापूर : शहरातील विविध भागात मुंबई, कल्याण नावाचा जुगार खेळणाऱ्या, खेळविणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी दुपारी ...
बदनापूर : शहरातील विविध भागात मुंबई, कल्याण नावाचा जुगार खेळणाऱ्या, खेळविणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली असून, यावेळी जवळपास साडेसहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बदनापूर शहरातील टिपू सुलतान चौकातील सार्वजनिक रस्त्यावर पैशावर कल्याण नावाचा जुगार खेळणाऱ्या, खेळविणाऱ्या साजीद मुन्नाभाई बेग (रा. बदनापूर), चंदू खडके (रा. अंतरवाला) या दोघांविरुध्द बुधवारी दुपारी पोलिसांनी कारवाई केली यावेळी ४४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर शहरातील कैलासनगर भागात जाणाऱ्या मार्गावर जुगार खेळणाऱ्या, खेळविणाऱ्या रामनाथ शामनाथ सुळे (रा. बदनापूर) व संतोष म्हस्कलेकर (रा. म्हसला, ता. बदनापूर) या दोघांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.