झोपा काढा आंदोलनानंतरही प्रशासनाला जाग येईना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:38 AM2019-01-06T00:38:32+5:302019-01-06T00:39:06+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी झोपा काढुन प्रशासनाच्या वेळकाढुपणाचा निषेध करण्यात आला. शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.
शिक्षकांना ४ हजार ३०० रुपये ग्रेड देण्यात यावा, चट्टोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणे निकाली काढण्यात यावेत, जिल्हा बदली विस्थापितांना गैरसोयीच्या पदस्थापना देण्यात याव्यात, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी झोपा काढत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरु, आर. एम. फटाले, ए. आय. मोमिन, राजेंद्र लबासे, सोमनाथ बडे, बी. आर. काळे, सुरेश धानुरे, प्रभाकर राजापुरे, राजाराम लकडे, लहू वीर, गणेश लादे, शिवाजी आडसूळ, सुनिल घाटेकर, दत्ता वाघमारे, मुकेश गाडेकर, बस्वराज आंबदे, फारूख सय्यद, नामदेव गिते, गिरिधर राजपुत यांच्यासह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यापूर्वीही या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.
जालना : उपाध्यक्षांनी घेतली दखल
दरम्यान, जि.पचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी शिक्षणाधिकारी पांडूरंग कवाणे, उपशिक्षणाधिकारी मापारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना बोलवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.
आंदोलनास राज्य प्रा. शिक्षक समिती, राज्य प्रा. शिक्षक भारती, अखिल राज्य उर्दु शिक्षक संघटना, बहुजन कास्ट्रटाईब कर्मचारी अधिकारी महासंघ, राज्य प्रा.पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, बहुजन शिक्षक महासंघ, राज्य पदवीधर शिक्षक संघटना, आस शिक्षक संघटना व शिक्षक भारती संघटना या संघटनानी पाठींबा दिला आहे.