अखेर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:50 AM2019-01-14T00:50:50+5:302019-01-14T00:51:44+5:30
तेराव्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर शेतक-यांनी रविवारी लाक्षणिक उपोषण मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : सिंचन विहिरीच्या अनुदानासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या शेतक-यांपुढे अखेर
प्रशासन झुकले असून, तेराव्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर शेतक-यांनी रविवारी लाक्षणिक उपोषण मागे घेतले.
परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर १ जानेवारीपासून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सवने आणि शेतक-यांनी सिंचन विहिरीचे अनुदान, पाणीटंचाई, मजुरांना कामे, बोंडअळीचे अनुदान देण्यात यावे, यासह विविध मागण्यासाठी लाक्षणीक उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तेराव्या दिवशी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांची उपस्थिती होती.
या उपोषणादरम्यान शेतक-यांनी जनावरे पंचायत समितीच्या आवारात आणून बांधले होते. तर आंदोलनात सहभागी शेतक-यांनी मुंडण आंदोनन करून प्रशासनाचा दहावा घातला होता. अधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. तेरा दिवस चाललेल्या आंदोलनास अखेर यश आले.