लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, यासाठी बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील युवक संजय ताकतोडे यांनी ५ मार्च रोजी जलसमाधी घेतली. त्यांच्या बलीदानाची दखल शासनाने तातडीने घ्यावी, या मागणीसाठी रविवारी सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकात रास्तारोका करण्यात आला.याप्रसंगी स्व. संजय ताकतोडे यांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत व शासकीय नौकरी संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र वेगळे आरक्षण अनुसूचित जातीतून देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी ‘संजय तेरा स्वप्न अधुरा मातंग समाज करेगा पुरा’ अशा घोषणा दिल्या.यावेळी राष्ट्रीय लहु शक्ती मराठवाडा अध्यक्ष रविकांत जगधने, जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, अंकुश राजगिरे, किशोर कांबळे, रतन लांडगे, किशन लांडगे, रामभाऊ सुतार, रामदास ससाने, विष्णू जाधव, छगन वाघमारे, विलास आघाव, बाळू पांडव, गुलाब राजगिरे, एन. डी. कांबळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलनामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सकल मातंग समाजातर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:08 AM