लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप व रबी हंगामाच्या पीकविमा वाटपात होत असलेल्या सावळ्या गोंधळाची चौकशी करावी, कृत्रिम पाऊस पाडावा इ. मागण्यां कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गांधीगिरी करीत मंगळवारी जिल्हा कचेरी समोर बेशरम लागवड करून उपोषण करण्यात आले.शेतकरी, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी व झोपलेल्या प्रशासकीय यंत्रणेस जागे करण्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष नारायण गजर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीमंत राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी शासनविरोधी घोषणा बाजी करण्यात आली. उपोषणात जिल्हाध्यक्ष नारायण गजर, श्रीमंत राऊत, डॉ. आप्पासाहेब कदम, शिवाजी लकडे, विदूर लागडे, दतात्रय कदम, नरेश वाडेकर, प्रदीप शिंदे, सावता बडदे, विठ्ठल चव्हाण, लक्ष्मण भडांगे, संतोष जाधव, गौतम गायकवाड, जगन्नाथ ठाकूर, गजानन जाधव, द्यानेश्वर भुसारे आदींचा सहभाग होता.
प्रहारकडून बेशरमाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:46 AM