महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:28 AM2019-05-30T01:28:33+5:302019-05-30T01:29:02+5:30
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. याच निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
खा. रावसाहेब दानवे यांची यासंदर्भात त्यांनी नुकतीच भेट घेऊन घनसावंगी तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पिकविम्याच्या अनुदानासंदर्भात चर्चा केली. दरम्यान अशाच आशयाचे निवेदन आपण घनसावंगीच्या तहसीलदारांसह जिल्हाधिकाºयांना दिले होते, असे अॅड. खरात यांनी सांगितले. मागील वर्षी खरीप हंगामात घनसावंगी तालुक्यातील शेतकºयांनी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेच्या कुंभार पिंपळगाव शाखेत १७ लाख रूपयांचा पीकविमा भरणा केला होता.
या पिक विम्यापोटी प्रियदर्शनी बँकेच्या कुंभार पिंपळगाव शाखेत ७० लाख ८३ हजार इतक्या पिकविम्याच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून ९६८ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. तसेच तीर्थपुरी येथील शाखेत शेतकºयांनी ७ लाख ९२ हजार इतकी रक्कम पीक विम्यापोटी भरणा केली होती. त्या अनुषंगाने तीर्थपुरी शाखेत आतापर्यंत ८ लाख ४६ हजार इतकी पीकविम्याच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून एकूण ११० शेतक-यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे.
मात्र, तालुक्यातील एकूण महसूल मंडळापैकी बहुतांशी मंडळास प्रामुख्याने बाजरी व मूग या दोनच पिकांचा विमा प्राप्त झालेला आहे. तीर्थपुरी शाखेला बाजरी व मूग या पिकांचा विमा मंजूर झाला असला तरी अद्याप पीकविमा मिळालेला नाही. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून शेतक-यांना न्याय देण्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक महसूल मंडळातील शेतकºयांना अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.