नेहमी सकारात्मक विचार ठेवा- सिंघल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:06 AM2019-11-23T00:06:56+5:302019-11-23T00:08:45+5:30
मुले वडीलधारी माणसांचे अनुकरण करतात. यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल करा, असा सल्ला औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिला.
जालना : मुले वडीलधारी माणसांचे अनुकरण करतात. यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल करा, असा सल्ला औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिला.
शहरातील पोलीस कवायत मैदानावर शुक्रवारी सकाळी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आयोजित जनतादरबार कार्यक्रमात सिंघल बोलत होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस कॉलनीमध्ये असलेल्या समस्यांचा पाढाच सिंघल यांच्यासमोर मांडला. पोलिसांच्या असलेल्या या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. असे सिंघल यांनी सांगितले. पुढे बोलताना रवींद्रकुमार सिंघल म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांनी नेहमी सकारात्मक मानसीकता ठेवावी. स्वत:समोर आव्हाने तयार करून त्याला ध्येय बनवावे. रोजच्या जीवन शैलीत बदल करा. तुमच्यात प्रचंड उर्जा आहे. मात्र, तिचा यापुढे उपयोग करा.
जालना तालुक्यातील सेवली येथील पोलीस ठाण्याच्या छताला पाऊस येताच गळती लागते. याचे पत्र गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आलेले असून, येत्या काही दिवसांमध्ये हाही प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस गृह उप. अधीक्षक ए. बी. देशपांडे, उप. विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. आगारकर, पोनि. यशवंत जाधव आदींसह पोलीस कर्मचाºयांची उपस्थिती होती.